STORYMIRROR

Mangesh Medhi

Others

3  

Mangesh Medhi

Others

सुखांत

सुखांत

1 min
418


हासता मी भासते तव शांत सारे

ह्रदयी जपले कितिक आकांत सारे


व्यथा कशास वदावी कोणास मी

अताशा कुठे होतात निवांत सारे


सुरळीत चाले व्यवहार सु-मनांचा

परी अंतरी नांदते अशांत सारे


दुनीयेच्या गर्दीत फिरस्ता जरी मी

साथीस मज माझे एकांत सारे


चुकवितो नजर मी छेडणारी भेदक

की सांगते नजर वृतांत सारे


सर्वज्ञ अव्यक्त अदृष्य जरी तू

पोहोचतील आर्जव तुजपर्यंत सारे


विखुरलेली जमीन येथली आहे तरी

जुळुन आलेत शेर सुखांत सारे


हासता मी भेटते नजर हासरी

अन विसरुन गेलो शोकांत सारे


Rate this content
Log in