विजयकुमार देशपांडे

Others


3.3  

विजयकुमार देशपांडे

Others


सुख मिळावे ईश्वरी संकेत नाही..

सुख मिळावे ईश्वरी संकेत नाही..

1 min 11.4K 1 min 11.4K

सुख मिळावे ईश्वरी संकेत नाही

दुःख माझा टाळण्याचा बेत नाही..


सापडेना जीवनी माझ्या किनारा

त्राण फिरण्याचे जुन्या नावेत नाही..


पाहिली जेव्हा खळी गाली तुझ्या मी

पाय आता काढता मी घेत नाही..


राहिले बुजगावणे शोभेस आता

पाखरे फिरण्यास पिकले शेत नाही..


ना दिसे एकांत कोठे भेटण्याला

बाग दिसते पण सखीला नेत नाही..


Rate this content
Log in