STORYMIRROR

UMA PATIL

Others

2  

UMA PATIL

Others

सुगंधी क्षणांचा

सुगंधी क्षणांचा

1 min
148

सुगंधी क्षणांचा असर राहिलेला

जणू गोठलेला प्रहर राहिलेला


मिळो ऊब आजी, मला आठवांची

तुझ्या पैठणीचा पदर राहिलेला


कसे फूल फुलणेच विसरून गेले ? 

कदाचित ऋतूंचा बहर राहिलेला


गुलाबी मिठीतून सुटले जरी मी

तरी गुंतलेला अधर राहिलेला


तुझ्या सोबतीने बघत स्वप्न आहे

नि स्वप्नामधे तू हजर राहिलेला


Rate this content
Log in