STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
225

तारूण्याची तूच कामिनी,

संस्काराची तूच स्वामिनी.

स्त्री शक्ती होऊन देतेस स्फूर्ती,

मातेचे रूप ते वात्सल्याची मूर्ती.


अबलेचे रूप सोडून,सबला स्त्री शक्तीची प्रगती.

प्रत्येक क्षेत्रात होत आहे तुझीच उन्नती.

शिवबाची जिजाऊ, झाशीराणीची किर्ती.

संघर्ष तीचा आत्मसन्मानाची घेऊन ज्योत हाती.


ओठावरील दुःख लपवित हसते,

निस्वार्थ संसाराचे कष्ट सोसते.

साऱ्या नात्यातील दोर ती प्रबळ.

स्त्री-शक्तीची महत्ती जाणती सकळ.


स्त्रीची निर्मिती गोड स्वप्न विधात्याचे.

वेदनेला ही लाजवेल अशी सहनशक्ती तूच.

बहूरूपात विरघळणारी दुधातली साखर ही तूच.

इतिहासाच्या पानापानांतून प्रगटलीस तूच.


पोर्णिमेचे रूप घेऊन संसार ती फुलवीते.

स्त्री-शक्तीची महती साऱ्या जगास पटू दे.

सासर,माहेरची कस्तुरीचा सुगंध तो दरवळू दे.

भ्रूणहत्या टळून तिच्यात कल्पना, इंदिरा दिसू दे.



Rate this content
Log in