Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

स्त्री जन्माचा महिमा

स्त्री जन्माचा महिमा

1 min
378


ओवी सांगे तुम्हा माझी

महिमा हो स्त्री जन्माचा

घ्या रे समजून 'ती'ला

होईल उद्धार युगांचा||१||


अनोखीच निर्मिती 'ती'

आहे देवाधिदेवाची

नाही होणार तिच्याशी

बरोबरी गं कोणाची ||२||


लेक,सखी,ताई,आई

भोगते सासुरवाशीण

एका-एका वाटेवर

काटे घेतेया टोचून ||३||


माऊलीच्या हृदयात

माया मधाळ पाझर

यत्ने आटणार नाही 

काय वर्णू मी पामर ||४||


सदा दुःखाचीच सल

नारी उरात दाबते

येते माहेर सोडून

नव्या संसारी साजते ||५||


म्हणे नको 'ती'पणती

हवा 'दिवा' ग वंशाला

बट्टा लावे का ती सासू

स्वतः स्त्रीच्याच जन्माला ||६||


मनी माया फुलविते

चिंता मनाचा कालवा

संजीवन देई बाळा

ओठी पान्ह्याचा ओलावा ||७||


नयनी आसवांचा पूर

आनंदाचा गं दुष्काळ

संसाराच्या काळजीने

मनी जपते हिरवळ ||८||


जग करते पूजन

नदीमाय नि गायीचे

घरची लक्ष्मीच सांगा

का हो वाहन पायीचे ||९||


वंदा साऊ, रमा मनी

मुजरा जिजाऊ,अहिल्येला

सप्तसूर्यतेजाठायी

आसमंतही लाजला ||१०||


Rate this content
Log in