सर सुखाची श्रावणी
सर सुखाची श्रावणी
1 min
341
सर सुखाची श्रावणी
झाली ओलेती धरणी..
सात रंगाचे गं स्वप्न
माझ्या रुजले लोचनी..!!
मन हिरवे पाचूचे
सय कोंदण गं होते..
शुभ्र दवाचे गोंदण
पानाफुलावर सजते..!!
खळखळ गं ओढीची
शांत लयीत धावते..
आशेच्या मलयातून
अवचित डोकावते..!!
सरीवर सर येते
मन सैरभैर होते..
माहेरच्या भेटीलागी
ओढ जीवास लागते..!!
