STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

सोनसळी झाले रान

सोनसळी झाले रान

1 min
238

थोडा दिवस अंधार

ओला सुकाळ दुष्काळ

पाठ दाखवी संकटा

फुले ओसाड ही माळ


गर्दी अफाट संघर्ष

हास मोकळ्या मनान

भर जीवन भंडार

सृष्टी पुस्तक हे छान


भुई अत्तराचा वास

झाड फुल धुंद पान

फुल काट्यात स्वच्छंद

सोनसळी झाले रान


न्यारी निसर्ग किमया

सारे मोहूनी रंगुया

मनी चैतन्य सुहास

मृदगंध सहवास


मना त्याग आत्महत्या

दिव्य प्रकाश त्रिकाळ

खेळ सारा प्राक्तनाचा

येई सुगीची सकाळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन