सोनचाफा
सोनचाफा
1 min
12.4K
सोनचाफा फुलला अन
परिमळ पसरला दारा
मोहित वातावरण करी
सुगंधित परिसर सारा
महती फुलांची
षडाक्षरी
महती फुलांची
वर्णावी मी किती
मोहित करिते
सुगंधित माती
आनंदी आनंद
मातीचा सुगंध
भावना विभोर
तोडी सारे बंध
ओलावा मातीचा
गंधित जाहला
गाभारा मनाचा
फुलूनिया साल
फुलांनी सजला
देव्हारा भक्तीचा
आशीर्वाद लाभे
परम शक्तीचा
अबोली गजरा
शोभतो ललना
जास्वंद मोगरा
अर्पूया ईश्वरा
चंपा नि चमेली
फूल जाई जुई
कुठूनिया येई
गंध नवलाई
निसर्गाची न्यारी
किमया ही सारी
त्यानेच लावली
जगी फुलवारी
