चारोळी...रेशीमबंध
चारोळी...रेशीमबंध
1 min
11.9K
तुझ्या स्पर्शाचा भासे
मजला रेशीमबंध
हवाहवासा वाटे तुझ्या
सानिध्याचा प्रेम सुगंध
आजवरच्या भेटीचे गुज
ठेविलेस तू प्रेमाने गुपित
मीही या सर्व आठवणींना
ठेविले हृदयाच्या कुपीत
पडता सडा प्राजक्ताचा
सुगंधित जाहली माती
त्यासवे बहरुनी आली
प्रेमाची आपली नाती
प्राजक्ताचा बहर येता
प्रेम तुझे फुलूनी येते
हळव्या शपथा घेऊनी
तू स्वप्न अधुरे सोडूनि जाते
