जुळली नाती
जुळली नाती
1 min
11.8K
योगायोगाने जुळली नाती
फुलूनी आली प्रीती
गाऊ प्रेमाची गाणी
घेउनी हात हाती
तुझी माझी झाली भेट
योग म्हणू की योगायोग
झोप नसे,चैन नसे जीवा
जडला मला प्रेमरोग
प्रेमाने पाहता सखे तू
सहवास वाटे हवा हवा
दिन रोजचाच,क्षण रोजचाच
परि भासे नवा नवा
भेटीत तुझ्या अविस्मरणीय
त्या गंधित मी जाहलो
मंद ,धुंद मिलनाच्या रमणीय
प्रेमात मी नाहलो
बघता तुला छेडल्या
गेल्या अंतर्मनाच्या तारा
बेधुंद होऊन प्रेमात केला
जीवन महोत्सव साजरा
हृदयाकडून हृदयाकडे जेव्हा
कवितेचा होतो प्रवास
भावनांचे प्रेमाने मिलन
नसे शब्दांचा केवळ सहवास
