STORYMIRROR

vitthal bhagwat

Others

4  

vitthal bhagwat

Others

एकांत

एकांत

1 min
23.2K

जीवघेणा एकांत आवडे कुणाला

सहवासाची मोल नसे धनाला

सहवासाची ओढ असे मनाला

आठवण तुझी क्षणाक्षणाला


भीती


तू असता सोबत दिन राती

मजला कसले भय नी भीती

तू दीपक अन मी ज्योती

बहरू दे प्रीती साताजन्माची


काळीज


तुझं येण जणू

नक्षत्रांचे देणं

काळजात राहणं

जणू कोरीव लेणं


काळीज


ओरखडा काळजावरचा

व्रण जुना सांगतो

तुझी वाट पाहत

अजूनही त्या ठिकाणी थांबतो


काजळ


नयनी काजळ ,भाळी कुंकू

केसात माळला गजरा

हातात कंकण,पायात पैंजण

साऱ्यांच्या तुझ्यावर नजरा



Rate this content
Log in