अक्षय तृतीया
अक्षय तृतीया
1 min
11.4K
सण अक्षय तृतीया
आनंदाचा मांगल्याचा
कृष्ण सुदामा भेटीचा
साडेतीन मुहूर्ताचा
पूर्वजांच्या स्मरणाचा
दिस ऋण फेडण्याचा
जलकुंभ ,वस्त्र ,धन
असे दान करण्याचा
घरी मुलीला आणूया
झोका झाडाला बांधुया
आमरस पोळी खाण्या
पितरांना बोलवूया
चैत्र गौरी विसर्जन
आज बसव जयंती
वर्णू महती मी किती
शुभ तिथी ही आखिती
शेतीकामा तो प्रारंभ
पाणी आडवू जिरवू
वृक्षसंवर्धन करू
संकल्पना ती राबवू
