सोड विचार
सोड विचार
1 min
218
अग सोड तू माझा विचार
मी तुझा खर्च कसा उचलणार.....
किंमत प्रेमाची करतो मी बेरोजगारीशी लढतो
जेवण बनवते तू शेगडीवर, चुलीवरचा धूर कसा जमणार??....
शायरी लिहून कुठे भाकर मिळे, तू श्रीमंतीत खेळे
माझी रात्र जमिनीवर तु, पलंगाविना कशी झोपणार....
नखरे कसे पूर्ण करू, तू गरिबीचा हात नको धरू
मी पायी चालतो, तुला गाडीविना नाही चालणार....
तुला आठवण करीन वचन देतो कोणाला ना पाहीन
संगमच नशीब खराब तुझ खराब नाही करणार.....
