STORYMIRROR

Deepali Mathane

Others

4  

Deepali Mathane

Others

संयमाचे मोती

संयमाचे मोती

1 min
215

मोहालाही जो करी वश

संयम नाव तयाचे

उपभोग्य मोहीनी लटा

आवळून धरी जयाचे

    इंद्रिय भोगावरी ठेवूनी

     कडेकोट कडा पहारा

     संयमाच्या माळांनी

     सजेल जीव सारा

वाणी जर असेल जहाल

तोडी नात्यांची बंधने

संयमी वाणी प्रेमळ

उधळीत शब्दसुमने

     राग-द्वेष भावना मनाची

     असो परिसीमा रागाची

    संयमी संस्कारी मोत्यांनी

  आभा खुलली व्यक्तीमत्वाची

उधळूनी रंग प्रेमाने

ताबा जीभेवरी ठेवा

जपूनी नात्यांचा गोडवा

लाभलेला सुखसौख्याचा ठेवा

    आयुष्याच्या वाटेवरती

    वेचूनी संयमाचे मोती

     अहंकारास न देता थारा

    उजळावी जीवन ज्योती


Rate this content
Log in