संत भगवान बाबा-पाळणा
संत भगवान बाबा-पाळणा
बीड जिल्ह्यात सूर्य उगवला
भगवान बाबांचे नाव दिले तयाला
सावरगाव नाव पवित्र स्थानाला
चमत्कार झाला पवित्र मातीला! जो बाळा जो जो रे जो
असा हा बाळ वाढू लागला
वैराग्य भावना लाभली देहाला
कष्टमय जीवन होते सांगतीला
संघर्ष त्यांचा आला लहान वयाला! जो बाळा जो जो रे जो
त्यातून वेळ काढे सत्संगाला
देहू,आळंदी वारी नित्यनेमाला
समाजप्रबोधन करी जनाला
मार्ग सत्याचा लोकांना दिला!जो बाळा,जो जो रे जो
थोर संत लाभले आयुष्याला
विचारधन वाटले मानवाला
समाज जागृती शिक्षण घेण्याला
महान संत राष्ट्र कार्याला!जो बाळा,जो जो रे जो
भगवान गड नावारुपाला
इतिहास त्याची साक्ष देण्याला
समाजाचे दैवत प्रेरणा देण्याला
समाजबांधव एकत्र करण्याला!जो बाळा जो जो रे जो
टाळ मृदूंग तिथे वाजला
सोहळा बाबांचा तिथे रंगला
रामकृष्ण हरि गजर झाला
वारकरी आनंदे नाचू लागला!जो बाळा,जो जो रे जो
जनसागर अथांग अफाट उसळला
बाबांचा आशीर्वाद कायम घेण्याला
पवित्र स्पर्श लाभे मातीला
स्फुर्ती मिळे आदर्श समाजाला !जो बाळा,जो जो रे जो
प्रेरणादायी जीवन वाहिले समाजाला
त्यागमुर्ती योगी लाभले मानवाला
लोभ नव्ह्ता ऐश्वर्यात जगण्याला
सदाशुद्ध आचरण भक्ती मार्गाला!जो बाळा,जो जो रे जो.
