सणासुदीचा पाहुणचार
सणासुदीचा पाहुणचार
1 min
280
घरी आलात तूम्ही मित्र चार
गोड मानून घ्या सणासुदीचा पाहुणचार....
आमंत्रण गरीबां घरी सणाचे
थोड्या सुख भोगलेल्या क्षणाचे
मित्रांनो तुमच्या मनाला करा तयार.....
माझी गरिबी मी कमनशिबी
केली मी दुःखाची ही जिलेबी
झाली ना गोड सांभाळून घ्या यार.....
दोस्त माझे तूम्ही हो श्रीमंत
मला माझ्या हो गरीबीची खंत
रोजच आहेत गरीबीचे सारखे वार.....
संगमचे हो तूम्ही जिगरी मित्र
कोरलं मी मनावर तुमचं चित्र
तूम्ही आलात आली सणाला बहार....
