STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

सण - उत्सव

सण - उत्सव

1 min
199

उत्सव येतात । प्रत्येक घरात ।

आनंद मनात । प्रत्येकांच्या ।। 

सगे नातलग । सखा जीवलग ।

भेटती सलग । निमित्ताने ।।

गोड धोड खाणे । ड्रेस नवा घेणे ।

शुभेच्छा ही देणे । एकमेकां ।।

अशी सण येती । सर्वां मोद देती ।

अवती भवती । प्रसन्नता ।।

सणांचा सोहळा । प्रत्येकी वेगळा ।

आनंदाचा मेळा । मनोमनी ।।

लहान सहान । सर्वाना समान ।

मिळतो सन्मान । सणासुदी ।।

असे येती सण । आनंदाचा क्षण ।

सुखी होई मन । क्षणोक्षणी ।।

विविध धर्मात । सण उत्साहात ।

साजरी होतात । घरोघरी ।।


Rate this content
Log in