STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

सण मकरसंक्रांत

सण मकरसंक्रांत

1 min
268

चला सण साजरा करू या मकरसंक्रातीचा 

एकमेकांच्या भावनांचा आदर जपण्याचा 

शुभेच्छा संदेश का होईना त्यांच्या आठवणींचा

या निमित्ताने का होईना शाब्दीक भेटीगाठीचा  


  नवीन वर्षातील सण आहे साऱ्या मानवजातीचा 

   तसाच ठरो साऱ्या आपल्या पक्षी प्राणी मित्रांचा 

   त्यांचेही ह्रदय आणि मन जपण्याचा

   भाषा मुक्या जीवांच्या समजून घेण्याचा 


संकल्प करू या निसर्गातील पक्ष्याना वाचविण्याचा

विरोध करू या पतंगाच्या जीवघेण्या धारधार मांज्याचा 

त्यांना अधिकार देऊ या त्यांचे जीवन जगण्याचा 

राखू या समतोल निसर्गाचा,साऱ्या प्राणी मित्रांचा  


   तिळगुळ वाटून एकमेकांचे तोंड गोड करण्याचा 

   आपसातील वाईट हेवेदावे कायम विसरण्याचा 

   मनातील सुडबुध्हीचा कायम पूर्ण विराम करण्याचा 

   हृदयाने ह्रदय मानवा मानवाचे प्रेमाने जोडण्याचा


Rate this content
Log in