संक्रमण
संक्रमण
1 min
167
धनू राशीतून मकरात सुर्याचे संक्रमण,
स्नेहाचे ऋणानुबंध जोडे सौभाग्यवाण.
ठेवून संस्काऱ्यांच्या वैभवांची जाण,
नटत,मुरडत प्रेम वाटण्याचा सण.
तेजपुंज विचार आयुष्यात भरू,
तीळगुळाची मधुरतेने मतभेद दूर करू.
उत्साह अत्तरी सुगंध चोफेर शिंपडू.
झाले मकर संक्रमण, प्रेमे नाते जोडू.
शरीरावरील रोगाचे संक्रमण टाळू,
आत्मचिंतनाने आरोग्य सांभाळू.
योग अभ्यासाने अंतरंगात जावू,
शरीर देते संकेत ध्यान जरा लावू.
