संक्रांत
संक्रांत
1 min
5
आपले नाते मधुर बहरते
भावनांचे होताच मिलन
सणांच्या या नित्य परंपरेने
समृद्ध होते मानवी जीवन...
मकर संक्रांतीचा हा सण
आलाय घेऊन अवीट गोडवा
तिळगुळाने एकत्र येऊन
दिलाय मानवाला आनंद मेळावा...
प्रेम देऊनी सदा प्रेम घ्यावे
नको दुरावा मनात कसला
मानवाचे जगणे हर्षाचे होऊ दे
नको जनमानसात हा अबोला...
सर्वांच्या मनात प्रेम जागावे
तिळगुळाच्या गोडव्याने बहरावे
आपुलकीच्या नात्यात बांधावे
जगणे सदा सुसह्य व्हावे....