संघर्षशील लेक
संघर्षशील लेक
1 min
435
सावित्रीची लेक ती संघर्षातून शिकली
कर्तबगार ती माय-बापाची लाडली ॥धृ॥
पावलावर पाऊल ठेवुनी शिक्षिका झाली
सार्या गावात ती आदरशील होती
आयुष्याशी ती खूप हो लढली
राक्षसवृत्तीने मानवाची डोकी हो फिरली ॥१॥
विकृताने हो घेतला तिचा बळी
नराधमाने तिला रस्त्यात जाळली
तिच्या देह-ध्येयाची राख हो केली
निर्भया म्हणुनी नावापुरती उरली ॥२॥
वासनेच्या किड्याने तिला हो मारली
वेदनेनं ती खूप किंकाळली
यातनेने तिची ज्योत मावळली
नराधमाला यातना व्हाव्या इच्छा ही उरली ॥३॥
