संघर्ष
संघर्ष
संघर्ष तर असतोच प्रत्येक मुलीच्या जीवनात
जन्मा पासुन ते मरेपर्यंत
सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत,
हे करू नको ते करू नको
हे तुला जमणार ते तुला शक्य नाही
असंच तिला ऐकावं लागतं
इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको
याचंच तिला दुःख असतं
वाटते तिला ही
कधी कुणाजवळ मन मोकळं बोलावं
कधी कुणा सोबत खळखळून हसावं
कधी आपले दुःख सांगावं
तर कधी कुणाचा आधार बनावं
कुणाशी जर कधी ती थोडं गोड बोलली
असे वागतात तिच्यासोबत
जशी ती आपली जहागीर बनली
अशी ही दुनिया आजची हराम आहे
जो भेटेल तिला तो ह्या व्यसनाचा गुलाम आहे
संघर्ष तर असतोच प्रत्येक मुलीच्या जीवनात
जन्मापासून ते मरेपर्यंत...
