STORYMIRROR

Pradip Hiwarkhede

Others

4  

Pradip Hiwarkhede

Others

तुझे बोट धरून चाललो आहे मी

तुझे बोट धरून चाललो आहे मी

1 min
390

तुझे बोट धरून चाललो आहे मी 

तुझी सावली बनून राहिलो आहे मी 

तू जे बोलली तेच बोलत आलोय मी 

तू जे काही सांगितले तोच आदेश मानत आलोय मी


तुझे बोट धरून चाललो मी 

तुझे नाव आहे म्हणुन ओळख आहे मी  

तू शरीर आहे तर प्राण आहे मी 

तुटणार नाही कधीच अशी नाळ आहे मी 


तुझे बोट धरून चाललो मी 

तू नसती जेव्हा जवळ तेव्हा घाबरतो मी 

आभास होतास तुझा थोडा सावरतो मी  

कशी दुर करू ही बेचैनी आई 

दूर इतकी आहेस तू अन् मी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन