STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

संधीसाधू

संधीसाधू

1 min
712

संधीकाल आला घेऊन सोनेरी रूप,

सूर्याने ही घेतले नारंगी स्वरूप.

छटा पसरली कशी मनमोहक.

पक्षी घरा परतले होऊन चातक.


अल्लड, अवखळ ही संधीकाल,

तुझ्या सहवासात बेधुंद मी आज.

आवरु कशी रे ह्या मना,

पुन्हा फुलला निशीगंध हा जुना.


कुण्या संधीकालात रंगत,

होती मैफिल नात्यातील ती सुरेख.

हितगुज ती मनामनातील सुखाची,

ऋणानुबंधचा फुले फुलवित मोरपंख.


दरवळे एकत्र कुटुंब राहून,

नंदनवनाचा फुलवित पिसारा.

संधीकाली चांदण्यात बसून चाले,

मैफिल सुगंधित, होऊनी फुलोरा.


रक्ताची जाण रक्तास होती तेव्हा.

भावास भाव म्हणण्यास लाजतो केव्हा.

माझा भाऊ ही नको माझ्या पुढे पहिला.

जीवाला जीव देणारा काळतो सरला.


संधीकाल आज हा बहरून आला.

हृदयातील सप्तरंगाची तार छेडू लागला.

स्वरगंगेतीरी चांदण्यात निर्मळ गाऊ लागला.

रक्ताचं नातं प्रेमांगणात न्हावून भेटू लागला.


Rate this content
Log in