समर्पित रविवार...!
समर्पित रविवार...!
(माझ्या सर्व आळशी मित्रांना समर्पित)
असा असावा रविवार
हे मला सांगावे
पण वाटत नाही
तेवढा सुद्धा
वेळ मला
द्यावा वाटत नाही
सुख भोगतांना
कोणी पहावे
असे मला वाटत नाही
पण त्या सुखाचे
सौख्य तुम्हाला
संगीतल्याविन रहावत नाही
कळले मला
दुःख सांगण्याने
कमी कधीच होत नाही
सुख मात्र
दुसऱ्याने
पाहिल्याविन लाभत नाही
दुःख खरेच
स्वावलंबीच
नक्की आहे
सुख मात्र
खरेच पूर्णतया
परावलंबीच आहे
म्हणून रविवार
साजरा करताना
तुम्हाला सामावून घेतले आहे
माझ्या सुखात
तुम्हाला मी
आज आमंत्रित केले आहे
सकाळी सकाळी
आळसात मला
तुमची आठवण झाली आहे
असा सुखद
रविवार मी
तुमच्यासवे अनुभवत आहे
मस्त सुट्टी
कामाला बुट्टी
तुमची माझी जमली गट्टी
रविवार तुमचाही
असाच सुखाचा
हंतरुणातच सरू दे
रवी राजाला
पण आता
आमच्या आळसाचे मोल कळू दे...!!!
