सलाम वीरा...
सलाम वीरा...
1 min
474
तो येणार म्हणून आईने दिवा लावला
त्याची वाट पाहत दिवा तेवत ठेवला
दिवा हा तेवतच राहिला,
पण तो अजून कसा नाही आला..
वाट पाहून ती आता थकली
कोणी तरी बातमी घेऊन आला
आजी आता वाट पाहा,
तुझा लाडला तिरंगा लपेटून निघाला..
तो आला अनंतात विलीन झाला
सरकारी इतमामात अग्नी संस्कार केला
लोक परतली आपल्या जागी,
आजीने तो दिवा तसाच पेटता ठेवला..
धन्य ती माता, ती बहीण
ज्यांनी आपला सुपुत्र देशाला दिला
त्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,
जाताना आमचे रक्त उसळून गेला...
जय हिंद...
