STORYMIRROR

Surekha Chikhalkar

Others

3  

Surekha Chikhalkar

Others

सल

सल

1 min
199

गलीत झाली गात्र प्रेमाचा स्पर्श ही जाणवत नाही

सुरकतल्या कातड्याचे ओझे ही 

आता पेलत नाही

पहिल्या सारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही //

आठवणींचा अल्बम उलगडत 

एकांत आता सोसवत नाही

अस्पष्ट झाल्या प्रतिमा 

मुखवटे आता सलत नाही

पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही //

प्रेमाचा उर अन् काळजीचा सूर

हल्ली ऐकण्यात नाही

शब्दांना अंकुर फुटावा असे पाऊल माझ्याकडे वळत नाही

पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही //

मुक झाल्या भावना , आर्त साद

त्यांच्यापर्यंत पोहचत नाही

गोठत गेली मनं मायेचा

उबदारपणा जाणवत नाही

पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही //

घर भरले अनावश्यक साहित्याने

माझी अडगळ पेलत नाही

त्यांच्या मधली माझी जागा 

शोधत नाही

पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही //

तुझाही फोटो आता धूसर झालाय

त्यावरील धूळ ही हटत नाही

 सुटलीस तू संसारातून तुझ्या आठवणी आता बोचत नाहीत

पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही //

माझेही भोग अजून 

संपले नाहीत

म्हणूनच देव ही मला

तुझ्याकडे बोलवत नाही

पहिल्यासारखे तुझ्याशी बोलणे आता होत नाही......होत नाही

Rate this content
Log in