STORYMIRROR

गीता केदारे

Others

4  

गीता केदारे

Others

... सिंहाचा दवाखाना....

... सिंहाचा दवाखाना....

1 min
522

एकदा जंगलात सिंहाने

सुरु केला दवाखाना

होते सारेच घाबरत 

आत कोणीच जाईना...


सिंहाला आला राग

डरकाळी फोडली त्याने

घाबरून येऊ लागले

प्राणी आळीपाळीने...


सर्वात अगोदर गेला 

पांढराशुभ्र ससा

तापामुळे झाला होता 

तो अर्धमेला जसा... 


सिंहाने तपासून

सांगितले सशाला 

लाल गाजर नि मुळा 

खायांचे औषधाला... 


नंतर नंबर हत्तीचा 

म्हणाला सिंहाला 

वाढलंय माझं वजन 

औषध द्या बारीक व्हायला 


म्हणाला सिंह हत्तीला 

केळी कमी खात जा 

सकाळ संध्याकाळ 

रोज व्यायाम करत जा... 


अशाप्रकारे छान

दवाखाना चालायचा

सिंह डॉक्टर सगळ्यांशी

गोड गोड बोलायचा


Rate this content
Log in