STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

" श्वासाचे स्पंदन"

" श्वासाचे स्पंदन"

1 min
228

तुझीच ही स्वप्ने रोज या नयनी


घेऊन जगतो तुझ्या आठवणी


तु जाता कधी सोडूनी मजला 


नसे माझा मी न आता कोणी...


ओलेचिंब देह वाळवीत रहावे


कुणी ही त्यावर ऊन फेकावे


ओलेतीया चिंब या देहावरती


पुनह: ही तुझेच नाव लिहावे...


मनी दरवळतो हा वेडा मोगरा


हा ध्यास असा मज कां तुझा


हा भास सदोदित मज हवासा


कां गोड मधुरस सहवास तुझा...


जगतो मी हा विश्वास कसा


जणु हा ध्यास लागतो प्रेमाचा


मन हरवते कधी झुरवते माझे


गहिवरते मन सखे या हृदयाचे...


मन हसते कधी रडते माझे 


कधी शब्दांतुनी उलगडते


कधी पळते कधी उडते प्रीया


फुलांवरी सुगंधापरी दरवळते....


कधी भिजून ते रुजते सख्या


या डोळ्यांतूनी अश्रृ झिरपते 


तू दिसता वाढे श्वासांचे स्पंदन 


अंग हे थरथरते मी माझा नसते........


साहित्याला गुण द्या
लॉग इन