सहवास प्रेमाचा
सहवास प्रेमाचा
1 min
180
सहवास तुझा खास
तरळून गेला मनी
ओघळत्या आसवांनी
चिंब झाल्या आठवणी
स्पर्श तुझिया प्रेमाचा
स्पंदने ती हृदयाची
भावना अधीर होते
आस पुन्हा भेटण्याची
साथ तुझा साजणी गं
खेळ जणू पावसाचा
ओथंबुनी येतो कधी
शिडकाव श्रावणाचा
वाटते मजला भीती
तुजला गमावण्याची
सहवास लाभो तुझा
हीच कामना मनाची
