शुक्रवार नव्या उमेदीचा..!
शुक्रवार नव्या उमेदीचा..!
शु भस्य शीघ्रम म्हणताच
क्र य शक्ती उत्तेजित झाली
वा ट लागल्या जीवनात
रग भरू लागली
न व नव्या कल्पना
व्या पक स्वरूपात दाखवू लागली
उ सणे अवसान गळून पडले
मे लेली आशा पल्लवित झाली
दि वस सौभाग्याचा उगवला
चा दर आळसाची आपोआप दूर झाली
तो रवी साथीस धावून आला
आपल्या तेजाने न्हाऊ घालू लागला
सारे अंग अंग कृपेने
चिंब भिजवू लागला
जगण्याची नवी उमेद जागवू लागला
बरे वाटले त्या तेज पुंज
रवीचे दर्शन घेऊन पुढे पाऊल टाकताना
तुमच्या साथीने सुप्रभात म्हणून
जीवनात पुन्हा मोकळा स्वास घेतांना
वाटले
गगन चुंबी ध्येय असावे
जीवनी स्वातंत्र्य लाभावे
स्थैर्य सदैव जीवनी नांदावे
नम्रतेत सारे जीवन सुखात सरावे..!
सुप्रभात...!
