STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शुक्रवार अंदाज अपना अपना..!

शुक्रवार अंदाज अपना अपना..!

1 min
277

शु ल्लक गोष्टींसाठी

क्र म बदलणे मला पटत नाही

वा ट लागते म्हणून

र डत बसणे मला आवडत नाही

अं गण वाकडे असले तरी

दां डपट्टा खेळणे मी सोडत नाही

ज रा जपूनच मी सार करतो

अ स्तनीतले निखारे पण बाजूस सारतो

प रवडत नसले तरी

ना टक मी चांगले साकारतो

अ स्ताव्यस्त घडी सावरत सावरत

प टवा पटवी जमवतो

ना टक मात्र मोठया जोमाने वठवतो...

   कळले असेल सारे

आम्ही कोण हे चांगलेच तुम्हा

कोणत्याच जय पराजयाची

  तमा नसते कधीच आम्हा....

  आम्ही पडलो ,हरलो तरी

नाक वर आमचेच असते

खापर फोडण्याचे तंत्रच

  आमच्या सारखे कोणाचे नसते....

  अंदाज अपना अपना

म्हणत आम्ही तोल सावरतो

पुन्हा पुन्हा मग त्याच त्याच

 खेळी पुन्हा खेळतो...

कोणी निंदा कोणी वंदा

राजकारण हा आमचा खांदानी धंदा

सदा सर्वदा म्हणतो आम्ही मोट बांधा

कोठेच नसतो कधी काही वांदा...!

सुप्रभात...!

(मनोरंजनार्थ मनोगत)


Rate this content
Log in