STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

शतदा प्रेम

शतदा प्रेम

1 min
144

आयुष्याच्या संध्याकाळी,

आठवे पुन्हा पुन्हा तीच प्रीत.

हाता मध्ये हात घेऊन,

सुख दुःखात होतो झुलत.


अहंम भावनांचा रंगात,

तुटला होता तो प्रपंच.

खोट्या मुखवट्यात लपला,

मी तू पणाचा नाट्यमंच.


क्षण सोन्याचे निसटून गेले,

केसांचा ही बदलला होतो रंग.

अमृताचा वर्षावात, गेला वसंत,

खेळ नियतीचा,कापला मी पतंग.


आत्मपरीक्षणाने समजली चुक,

सुरवात मी का करावी ती म्हणत.

संचारबंदीने वितळविली हळूहळू,

दोघांच्या मनातील अतुट भिंत.


शतदा प्रेम करावे म्हणून झाली भेट,

आले किती वादळे, तुडवू वाळवंट.

सामंजस्याच्या गालीच्या वर हसत,

राहू दोघे मग्न,स्वर्ग सुखांच्या मिठीत.



Rate this content
Log in