श्रमाचे महत्व
श्रमाचे महत्व
1 min
1.0K
चंचल मन हे तरुणाईचे,
अस्थीर अन अधीर झालय,
अभ्यास,श्रम करायचे सोडून,
मोबाईलमय झाले मनोवलय.
प्रयत्नवादाची धरुनी कास,
यशस्वीतेचा करुया संकल्प,
आत्मविश्वासाने श्रम करुनी,
प्रगतीस नका ठेऊ विकल्प.
आत्मविश्वासे कास धरु,
सदा श्रम,प्रयत्नवादाची,
जाई पुर्णत्वास स्वप्नमालकी,
हिच गुरुकिल्ली यशाची.
कर्तृत्वाला असेल जर साथ,
श्रमरुपी आत्मविश्वासाची,
अन ध्येयरुपी प्रयत्नवादाची ,
हिच नांदी खरी विकासाची.
श्रम करुनी घाम गाळूनी,
ख-या सुखाची फळे चाख,
स्वार्थाने नको लुबाडू कुणा,
होणार तुझी एक दिन राख.
