||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
कर्दळीवनात प्रकट होई |
स्वामी समर्था माझी आई | |१| |
घेई अवतार नृसिंह सरस्वती नंतर |
भक्तगणांना देई कधी न अंतर | |२| |
प्रसिद्ध अक्कलकोट स्वामी नामे |
दर्शनाने पूर्ण होती भक्तांची कामे | |३| |
श्रीदत्तात्रेयांचा स्वामी समर्थ अवतार तिसरा |
नामस्मरणमात्रे भक्तांनो दु:ख दैन्य विसरा | |४| |
भिऊ नका स्वामी असतात सदा तुमच्या पाठीशी |
स्वामींच्या कृपेनेच प्राप्त पुण्याई गाठीशी | |५| |
चंचलभारती,दिगंबर बुवा अशी काही नावे केलीत धारण |
मंत्रशक्ती सामर्थ्य सिद्धी प्राप्त अव्हेरली मोहिनी विद्या जारण | |६| |
स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त केलेली रचना! स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात माहिती देण्याचा हा प्रयत्न!