शरदाच चांदणं
शरदाच चांदणं
1 min
354
आनंदाच्या उत्सवात
न्हालं शरदाच चांदण
लख्ख चंद्र प्रकाशात
उजळलं माझ आंगण
दुधात हसरा चंद्रमा
डोकावला नभातूनी
सुखद हसरी नाती सारी
जपली हळूवार मनातूनी
चंद्रसाक्षी हा तारकांचा
हुरळला आज प्रेमातुनी
चैतन्याचे मोहक चांदणे
शिंपूनिया अंतरंगातुनी
धुंद हवाही साद घाली
प्रीत बावरी होऊनी
मोहकशा चांदण्यात सजे
महफिल ही गायनातुनी
कोजागिरी पोर्णिमा ही
बासुंदीची साथ करूनी
आयुष्याचे क्षण हे हसरे
लाभो तुम्हा सदैव जीवनी
