STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

श्रावण सरी

श्रावण सरी

1 min
217

श्रावण सरी प्रभाती 

मेघ दाटले अंबरी 

कोवळ्या किरणातूनी 

बरसती ओल्या सरी ||१|| 


सुंदर सजून सृष्टी 

सारी अंगात कंचोळी 

गवत फुलांच्यावरी 

दवबिंदू निळी निळी ||२|| 


भिजला माती फुलतो 

अंकुर काळ्या उदरी 

डुलती ही सारी पिके 

कष्टाच्या या घामावरी ||३|| 


श्रावण हा येतो जातो 

कधी सुखदुःख उरी

तुझ्या येण्याने श्रावण 

आनंदीतो शेतकरी ||४|| 


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை