श्रावण सरी
श्रावण सरी
1 min
301
मेघ दाटत अंबरी
रंगली श्रावण सरी
सृष्टी नटली सारी
लाली चढे फुलांवरी
वाहे निर्झर हे झरे
चराचरी बहरली
धरा तृप्तली सरीनी
प्रेम बीज अंकुरली
सामंजस्य एकजूट
शिकवण पल्लवीत
गंधाळली अर्तबाह्य
प्रेमांकूर प्रज्वलित
घेई परिक्षा जीवनी
होई सुकाळ दुष्काळ
शेतकरी घालमेल
नव बळ उद्यकाळ
जीवा स्वयंसिद्ध करी
सरे यौवन निश्चित
सांगे नांदा सौख्य भरे
साऱ्या आनंद वाटीत
