श्रावण मनात
श्रावण मनात
सुरू झाला श्रावण मनातला.
रिमझिम पाऊस धरतीवर.
हिरवा शालू पांघरूणी,
आली अप्सरा जणू धरणीवर.
श्रावणसरीचे ते लोभस रूप.
मना प्रगटली काव्यांचे स्वरूप.
गेले जळून होते जे विदरूप.
गाणे गावूनी,आला हूरूप.
मोहवीते मजला श्रावण मनातला,
नाचते मन, घालून पैजणी.
सणाचा त्यात साज शिंगार,
रमले बालपण,फुगड्या आठवूनी.
होता तो काळ मनोहर.
माणूसकीचे झरे निर्मळ.
नव्हता अहंम अहंकार.
एकमेकांस साथ देत,सारे प्रेमळ.
श्रावणसरीनो या हो भर भरूनी.
कलीयुगाचे झळमट दूर ने वाहूनी.
आण तूच ग ह्या धरतीवर,
आणून ठेव स्वर्गच अवतरूनी.
नवीन चेतना अन पालवी,
बहरून येऊं दे साऱ्याच्या जीवनी.
पळवून लाव हा अंधार काळा.
करू साजरा श्रावणसरीचा सोहळा.
