STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

4  

VINAYAK PATIL

Others

शोध सुखाचा

शोध सुखाचा

1 min
402

कुठे शोधिसी सुखाला 

आहे तुझ्याच अंतरी 

जरा डोकावूनी बघ 

दिसे मनाच्या मंदिरी ||१|| 


धावू नको सुखामागे  

थोडा संयमाने रहा 

येई सुख तुझ्या दारी 

फक्त आनंदाने रहा ||२|| 


असे परिभाषा त्याची 

बंद कुलूपासारखी 

योग्य चावी लावताच 

होई ईच्छा मनासारखी ||३|| 


Rate this content
Log in