शोध चांदणीचा
शोध चांदणीचा
1 min
2.6K
नभाच्या दाटीमधे चंद्र शोधे चांदणीला
विरहात झुरतो आठवून क्षणाक्षणाला.
पोर्णिमेच्या रात्रीलाही पहातो भाऊक तिला
क्षण न येता मिलनाचा वणवा ह्रदयाशी पेटला.
घेऊन घाव मनी जखमा सोशी प्रेमात सदा
डुबून रहातो चांदणीच्या खयालात.
आला क्षण अंती श्वासात तिच्या गुंतायचा
हरवीत भावनेत कवेत तिच्या निजायचा
