अता मैत्रित ना कुणाच्या
अता मैत्रित ना कुणाच्या
1 min
2.7K
आता मैत्रित ना कुणाच्या, गुंतायचे ठरवले
आता गर्दीत माणसांच्या ना हरवायचे ठरवले.
जगले नेहमीच एकटी गर्दीत सोय-यांच्या.
आता वळचणीला ना कधीच त्यांच्या जायचे ठरवले.
गरजे नुसार सा-यांनी वापरले माझेच अश्रू आता
कुशीत ना कुणाच्या कधीच रडायचे ठरवले.
आली कित्त्येक आमंत्रणे सुखांची मलाही,
अता मैफीलीत ना कुणाच्या कधीच थांबायचे ठरवले.
उभे आयुष्य राहीले मी तारण तुझ्याच सुखांना,
आता कोणा....
