ढोलकीच्या तालावर
ढोलकीच्या तालावर
1 min
13.8K
उघड्या पायात तिच्या घुंगरु वाजायचे,
शिक्षणासाठी माझ्या रातभर जागायचे.
सोसल्या तिने नजरा, दुनियेत या लांडग्याच्या
खोटा भाव दाखउन, चेह-यावर शृंगाराचा.
वाजायचे घुंगरु तिचे, ढोलकीच्या तालावर.
झळ लागू दिली नाही, माझा पैंजणाच्या पायावर.
पण नशीबाने मांडला, पुन्हा तोच खेळ.
तमाशाच्या फडावर झाला, पैंजणाचा घुंगराशी मेळ.
