पैंजण
पैंजण
1 min
16.4K
रात्र हाेती धुंदावलेली, पावसाच्या शिडकाव्याने
तुझी हालचाल मीठीतली, जाणवू लागली पैंजणाने
हळुच फुलले ओठ तुझे, अलवार माझ्या चुंबनाने.
बेधुंद झाला ताे क्षण, तुझ्या पैंजणाच्या तालाने
बेबंद झालीस तुू माझ्या बेभान आवेगाने
पैंजणालाही गवसले सूर, प्रणयाच्या मादक स्पर्शाने
रात्र सारी अनुभवली, तुझ्या कवेतील चांदण्याने
श्वास श्वासात गुरफटून गेला, अशी रंगविली रात्र, पैंजणाने.
