शोध अस्तित्वाचा
शोध अस्तित्वाचा
अंतरीची चाहुल येते कानी
कोण तु सांग ना मला येउनी
शोधता स्वत:ची ओळख खरी
सांगे सत्यात मी कुठेच नाही
उरतला श्वासही मागती ओळख
देती हुलकावणी जगण्या साठी
आज या वळणावरती पाहता वळुनी
अभसिक धुके ही ओळख विसरते
गति श्वासाची लयीत बंदीस्थ होते
संपण्यात का अशी धन्यता मिळते
नसते का माझी मी ची ओळख
खरी मी अबला की भोग्य, नाकारलेली
अस्तिवाची होळीका होते जीवनी
मानस ही विरतो कूठेसा दुर देशी
खरी मी तळपती तलवार जशी
देईन आघात तरी ठरते शोशिक संसारी
केवल मीच एक उद्गारला असे हुंकार
जाणवली मज तो निखारा दवा सम
खडतर प्रवास माझा वेदनेचे दागिने
शोभते मी क्षत्रीय स्त्री खरया अर्थाने
केवल पर परंतू च्या भित्तिचित्रांची
नको वाटे त्या शब्दांची काव्यरचना ही
आत्मविश्वासची जागे मज तहान
होते माझ्या हाकेत जागे सारे रान
रण रागिणी व्हावं व्हाव चमक्ती विज
रोहिणी भमिनी कामिनी सुवसिनी
पेक्षा ही भावते आज च्या मी ला
तळपती ती तलवार या मनी...