शेवटची इच्छा
शेवटची इच्छा
1 min
408
एकदा ये रे आणी वरदान मला देऊन जा,
प्रेमाच्या अडीच अक्षरांचा अर्थ मला समजवुन जा,
येऊन तु माझ्या डोळ्यातील भाव न सांगता ओळखुन जा,
ये तु माझ्या आयुष्यात आणी रंग तु भरून जा,
ये तु आयुष्यात माझ्या येऊन जीवनाला अर्थ लावुन जा,
ये तु सुखात आणी दुःखात ही
कायमची अशी साथ देऊन जा,
येतोच आहे तर जन्माची घट्ट बांधून जा,
येऊन तु तुझ्या माझ्यातल अंतर
पार तु करून जा,
येऊन तु हंसती खेळती मला करून जा,
येतोच आहे तर फक्त प्रेम आणी प्रेमात मला न्हाऊन जा,
येऊन तु फक्त माझा आणी माझा होऊन जा,
