STORYMIRROR

Shreya Shelar

Others

4  

Shreya Shelar

Others

शेवटची भेट

शेवटची भेट

1 min
1.0K

तुला नको असलं तरी मला शेवटचं भेटायचं आहे

तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायचं आहे


ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांत आणायचं नाही पाणी

पण माहिती आहे भेटल्यावर अश्रुन्शिवाय बोलणार नाही कुणी


खूप काही बोलायचा आहे खूप काही सांगायचं आहे

मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे


तुझा शेवटचा चित्र मनात रंगवायचा आहे

हा चेहरा परत दिसणार नाही म्हणून मनाला समजवायचा आहे


जाता जाता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे

एकदा मिठीत घेऊन तुला अश्रूंमध्ये चिंब भिजायचं आहे


Rate this content
Log in