शब्दांच्या गर्भात
शब्दांच्या गर्भात
शब्दांच्या गर्भात,अक्षरे लपलेली
निवांत,शांत,गाढ झोपलेली....
शब्दांच्या गर्भात,जादू अक्षरांची
जशी गुंफली,माळ मोत्यांची.....
शब्दांच्या गर्भात,मायेचा झरा
वात्सल्याची चादर,वाहते विचारधारा...
शब्दांच्या गर्भात,शब्दांची किमया
शब्दच आधार,शब्दच माया....
शब्दांच्या गर्भात,शब्दच संपत्ती
शब्दची धार,ओढवे आपत्ती....
मृदू शब्द,गोड शब्द,लपले शब्दांच्या गर्भात
कटू शब्द,कठोर शब्द,शब्दांचा पसारा जगात..
शब्दांनीच तोडतात,माणसांची मने
शब्दांनीच जोडतात,नांत्यांची गुंफणे...
शब्दच धन,शब्दच माणीकमोती
शब्दांमुळेच उजळल्या,सावित्री-ज्योती...
शब्दच आमुचा,मराठी बाणा
मराठीचे महत्त्व,आता तरी जाणा...
शब्दच आहेत मायेचा ओलावा
शुध्द अंतःकरणातूनी शब्द पाझरावा...
शब्दांच्या गर्भात,वाक्याची सरीता
वापरावे जपून शब्द,का राग मनात धरिता...
शब्दांचे सौंदर्य,आकार,उकार,वेलांटी
नाही दिली नीट तर,शब्द घेतात कोलांटी...
