Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pranjali Kalbende

Others

3  

Pranjali Kalbende

Others

शब्दाचे वार

शब्दाचे वार

1 min
224


वेदनादायी बहु शब्दाचे वार

देवीच्या भक्तीत आजचा वार

संगरी जवानांचा शत्रूवरी वार

प्रित कटाक्षाने केला हदयी वार १


शब्दाच्या गावात भावना उतरली

व्यथित मनातून प्रिये तू उतरली

जळात धुंद नाचत राधीका उतरली

गुरुच्या कसोटीवर बालके खरी उतरली २


तुझ्या प्रेमात झालो पुरता ठार

निरपराधाला करू नये उगा ठार

महागाईने सामान्य होतोय ठार

कलीयुगात या माणुसकी झाली ठार ३


शब्द शब्द जोडूनी काव्य घडले

सुखदुःखाशी झगडत जीवन घडले

अवचीत तूझ्या विरहाचे दुःख घडले

विद्येच्या आधारे व्यक्तिमत्त्व घडले ४



Rate this content
Log in