शब्द......
शब्द......
1 min
183
शब्दच घेतात काळजाचा ठाव
शब्दच व्यक्त करतात अंतरीचे भाव
शब्दांनीच जिंकता येत एखाद्याचे मनं
शब्दासमान नसे अमुल्य कुठलेच धन
शब्दांनीच बांधल्या जातात मनामनाच्या गाठी
शब्दांनीच व्यक्त होते भावना एकमेकांसाठी
शब्दांच्या या जादुभऱ्या दुनियेत
शब्दांनीच प्राण फुंकले या कवितेत
